चलवेनहट्टी येथे महाशिवरात्रीचे आयोजन
चलवेनहट्टीतील ब्रम्हलिंग देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी मंदिरांत पुजा होईल तसेच रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे या निमित्त मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असुन शनिवार दिनांक ९ मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे .
महाप्रसादला सकाळी ८-०० वाजता सुरूवात होईल समस्त भाविकांनी दर्शनसह महाप्रसादच्या लाभ घ्यावा असे आवाहन शिवरात्र उत्सव मंडळ तसेच ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार कमिटीने ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.