स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि व्ही. बी. एस. एस. गर्ल्स हायस्कूलच्या दहावी १९९३-९४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ”मधुरा हॉटेल मध्ये साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या शाळेचे गुरुजन वर्ग मेळाव्यास हजर होते. उचगांव. कल्लेहोळ. चिरमुऱी. बसूर्ते, बेक्कीनकरे अतवाड, कोणेवाडी, येथील माजी विद्यार्थी उपस्थित होते.
३० वर्षांनंतर ४५ ते ४७ वयोगटातील सर्व मित्र-मैत्रिणी विद्यार्थीदशेत जाऊन जुन्या आठवणीत रममाण झाले. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात स्वर्गीय आनंद काय असतो याची या सोहळ्यामुळे सर्वांनी अनुभुती घेतली. संपूर्ण दिवस आनंदी व मजेत कसा गेला हे समजलेही नाही. इतर सर्व औपचारिक गोष्टींना फाटा देऊन जास्तीत जास्त एकमेकांशी हितगुज करणे हा उद्देश असल्यामुळे पहिल्या सत्रात ओळखी, मनसोक्त गप्पाटप्पा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी व गुरुजनांचे मौलिक विचार व अनुभव ऐकायला मिळाले.
दुसऱ्या सत्रात मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. ललिता पाटील ने निवेदन केले. लावणी सम्राट बालाजी चिकले यांनी लावणी सादरीकरण करून आनंदीत केले. स्नेहमेळाव्याची आठवण म्हणून सर्वांना मोमेंटो देण्यात आले. तसेच
स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी उमेश नागोजीचे.बाळू जाधव, उत्तम सुर्वे, बालाजी चिकले,शंकर राक्षे,उमेश चौगुले, राजू जाधव, चांगदेव वेताळ, महेंद्र जाधव, ललिता पाटील, सोनाताई मरुचे, दीपा बेळगांवकर, कविता तगांनकर,लता कोवाडकर, रेखा कदम आदींनी विशेष परिश्रम घेतले. लीना फर्नडिस ने सगळयांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.