बेळगाव : आंतरराष्ट्रीय दर्जाचे सतारवादक उस्ताद शाकीर खान यांच्या सतारवादनाची मैफल रविवार दि. २६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता जीआयटीच्या रौप्यमहोत्सवी सभागृहात होणार आहे. त्यांना तबल्यावर कार्तिक स्वामी यांची साथ असणार आहे. सदर मैफल सर्वांना विनामूल्य खुली आहे. तथापि, रसिकांच्या सोयीच्यादृष्टीने मोफत प्रवेशिकांसाठी अवधूत सुखटणकर, मो. क्र. ९३४११००१७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे