No menu items!
Friday, December 6, 2024

ग्रामपंचायतीचे पीडीओंना निवेदन

Must read

सुळगा हिंडलगा येथील शंकर गल्ली आणि देशपांडे कॉलनी मध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात अडथळा येत आहे .ज्या व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी येथील ग्रामपंचायत पीडीओंना निवेदन देण्यात आले आहे

येथील रस्तामंजूर झाला असताना या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. रस्त्याच्या हद्दीत जे काही अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी रस्ता गटारी करण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी पत्राद्वारे केली आहे.

येथील रस्त्यावर अतिक्रमण केल्याने घरातील सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना देखील चारचाकी गाड्या घेऊन जाताना अडथळा होत आहे त्यामुळे जो रस्ता मंजूर झाला आहे ठिकाणी रस्ता करावा आणि रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटवावे अशी मागणी सुळगा येथील ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!