आजपासून पीयू आणि पदवी महाविद्यालये पुन्हा सुरू झाल्याने जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी सरदार्स हायस्कूल आणि पीयू महाविद्यालयाला भेट दिली.
यावेळी शाळा कॉलेज मधील कर्मचाऱ्यांनी हिजाब घालून आलेल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसबाहेर काढले . यावेळी शिक्षक आणि इतर कर्मचारी गेटवर उभे राहून विद्यार्थ्यांना हिजाब काढण्यास सांगत होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन केले.
शालेय मुली सूचनांचे पालन करत असल्या तरी, महिला सामाजिक कार्यकर्त्यांपैकी एकाने मंगळवारी शिक्षकांशी वाद घातला ,आणि म्हणाल्या की मुली हिजाब घालणे हा त्यांचा हक्क आहे .आणि या हक्कास्तव त्या कधीही हिजाब काढणार नाहीत असे सांगितले मात्र, विद्यार्थिनींनी त्यांची पर्वा न करता सूचनांचे पालन केले.