बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 22 ते 25 सप्टेंबर 2024 रोजी रिंक रेस शिवगंगा स्पोर्ट्स क्लब व रोड रेस आदर्श स्कूल रोड ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ बेळगांव येथे करण्यात आले आहे.केरळ, महाराष्ट्र, गोवा,दिव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 च्या वर टॉप स्केटर्स सहभागी होणार असून या स्पर्धासाठी 1 सीबीएसई निरीक्षक भारतीय रोलर महासंघटना यांच्या वतीने 18 ऑफिशियल बेलगाम डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असो यांच्या वतीने 20 मदतनीस व गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल चे 45 शिक्षक हे सर्वजण ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काम करणार आहेत .या स्पर्धेचे उद्घघाटन पोलीस कमिशनर श्री लाडा मार्टिन मार्बानिंनग यांच्या शुभ हस्ते होणार असून यावेळी अमित घाटगे, प्रेरणा घाटगे मॅनेजिंग डारेक्टर गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल, शाळेच्या मुखयाध्यापिका प्रचिती आंबेकर, इंदुधर सीताराम सेक्रेटरी कर्नाटका रोलर स्केटिंग असो.,उमेश कलघटगी, ज्योती चिडक,निखिल चिंडक,स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळुरकर,इम्रान बेपारी, बेळगाव मधील इतर मान्यवर व शाळेचा स्टाफ हजर राहणार आहे.
गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन
By Akshata Naik

Must read
Previous articleदिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाची रंगतदार मेजवानी
Next articleनिपाणीतील ट्रकचालक बेपत्ता