शहरात पाण्याची समस्या अत्यंत गंभीर बनली आहे येथील चन्नम्मा नगर लक्ष्मी मंदिराजवळील रहिवाशांना तर पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. या भागात गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी आले नसल्याने नागरिकांना पाण्याविना राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या भागात सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी येथील नागरिकांनी आंदोलन करून केली आहे.
त्याचबरोबर येथील भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास अनेक अडचणी येत आहेत. वेळेवर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच बस चालक देखील विद्यार्थ्यांची उद्धटपणे वागत असल्याचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे या भागात वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी अशा मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी बस अडवून आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले .