राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून शनिवार दि.२६ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत ‘रन फॉर आयुर्वेद’चे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्प पोलीस स्टेशनहून या रनला सुरुवात होईल. त्यानंतर संचयनी सर्कल ते चन्नम्मा सर्कल असा रनचा मार्ग आहे. यासाठी एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजने पुढाकार घेतला असून त्यांना बी. एम. कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय, डॉ. रवी पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे.