कर्नाटक सरकार ,युवा सबलीकरण आणि क्रीडा इलाखे कर्नाटक क्रीडा प्रधीकार आणि कर्नाटक ऑलम्पिक संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 17 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर रोजी कंटेरवा इनडोअर स्टेडियम बेंगलोर येथे तायक्वांदो मिनि ऑलम्पिक स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यातून निपाणी येथून के एल ई,सी बी एस ई शाळेच्या विद्यार्थिनींची निवड झाली होती या स्पर्धेमध्ये 34 किलो आतील वजन गटात सोनल लिगाडे कास्य पदक पटकावले तर सौम्या खोत हिने अंतिम फेरी पर्यंत लढत देत 53 किलो आतील वजन गटात रौप्य पदक पटकावले, तर 53 किलो वरील वजन गटात अफ्राह पठाण हिने कास्य पदक पटकाविले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कर्नाटक राज्यातून बेळगाव, धारवाड, विजयपूर, रायचूर, चिकमंगळूर, दावणगिरी, बेंगलोर अर्बन, बेंगलोर रुरल , अशा एकूण आठ राज्यातून मुला मुलींनी सहभाग घेतला होता. निपाणी येथील सद्गुरु तायक्वांदो अकॅडमीच्या मुलीने ऑलम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन एक रौप्य पदक तर दोन कास्य मिळवून निपाणीला तीन मिनी ओलंपिक मेडल मिळवून देण्याचे मानकरी ठरले कर्नाटक राज्यामध्ये निपाणी गावचे नाव तायक्वांदो क्रीडा प्रकारामध्ये निपाणी चे नाव लौकिक केले.
एकीकडे आज कालचे विद्यार्थी मैदानी खेळ खेळल्यास विसरत आहेत. मुला मुलींनी मोबाईल ,टीव्ही ,कम्प्युटर, च्या दुनियेतून बाहेर पडून तायक्वांदो सारखे खेळ आत्म साथ करून स्व:संरक्षण प्रशिक्षण आत्मसात करून निरोगी जीवन जगावे असे मत शाळेच्या प्रिन्सिपल आशा मार्टिन यांनी व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थिनींनी टीव्ही मोबाईल कम्प्युटर या गोष्टीवर मात करत शालेय अभ्यास क्रमाबरोबर स्वतः चे तायक्वांदो छंद जोपासत या तीन मुलींनी रोज चार तास सराव करून आपले आई-वडिलांचे निपाणीचे व शाळेचे नावं लौकिक करण्यासाठी प्रयत्न केले त्याबद्दल सर्व शहरातून त्यांचे खूप खूप कौतुक होत आहे.
यशस्वी विद्यार्थिनींना शाळेच्या प्रिन्सिपल आशा मार्टिन , तायक्वांदो प्रशिक्षक बबन निर्मले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. यशस्वी विद्यार्थिनींना कर्नाटक ऑलम्पिक संस्थे कडून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.