बेळगाव-
बेळगाव उत्तर मतदार संघाच्या विकासासाठी बांधिल असलेले आमदार आसिफ सेठ यांनी बेळगाव मधील विविध भागात अनेक प्रकल्पांचे आज मंगळवारी उद्घाटन केले. वीरभद्र नगर, बॉक्साईट रोड, आझम नगर, क्लब रोड, श्रीनगर आणि खुसरो नगर यासह अनेक भागातील कामांचा यामध्ये समावेश आहे. या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या उणिवा आता या विकास कामामुळे भरून निघतील. त्यामुळे चांगले रस्ते, ड्रेनेज सिस्टीम उत्तम प्रकाशयोजना, उद्यानांची निर्मिती, उत्तम सार्वजनिक वाहतूक, सामुदायिक केंद्रांची स्थापना तसेच सार्वजनिक सुविधा येथील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. बेळगाव शहराला आधुनिक आणि सुसज्ज शहरी केंद्रात रूपांतरित करण्याच्या मोठ्या दृष्टीकोनाची हि केवळ सुरुवात आहे, बेळगाव उत्तर भागातील रहिवासी अशा भविष्याबद्दल आशावादी आहेत जिथे बेळगाव शहर हे विकासात्मक प्रकाल्पानी युक्त, स्वच्छ आणि वाढत्या लोकसंख्येच्या मूलभूत गरजा हाताळण्यासाठी तत्पर असेल . असे आमदार असिफ सेठ म्हणाले. यावेळी युवा कार्यकर्ते अमान सेठ, भागातील नगरसेवक, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.