ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची संख्या कमी असल्याने गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना बसच्या शेवटच्या पायरी वर थांबून लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे एखाद्याचा तोल जाऊन अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे महत्त्वाचे बनले आहे.
गणेशपुर बेकनहळ्ळी यळेबैल, तुडये राकस्कोप बेळगुंदी सोनोली गावातून नागरिक आणि विद्यार्थी , शिक्षणासाठी आणि कामासाठी येत असतात. मात्र या भागात अपुरी बस सेवा असल्याने सर्वांना तास बसमधून प्रवास करावा लागत आहे.
बसची संख्या कमी आणि नागरिक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. तसेच मागून येणाऱ्या वाहनांचा वेग देखील जास्त असल्याने अनावधानाने एखाद्याचा तोल जाऊन आता घडण्याची शक्यता आहे.
तसेच येथील बस थांब्यावर बस न थांबता पुढे थांबत असल्याने आणखीन समस्या वाढली आहे. त्यामुळे एक जण बस चुकेल या नादात एकमेकांना धक्काबुक्की करून बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेस त्यामुळे काहीजण जमिनीवर पडून त्यांना दुखापत होत आहे. त्यामुळे हा प्रकार थांबावा याकरिता संबंधित प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जादा बसेस पुरवण्याची गरज व्यक्त होत आहे.