खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमिनी व मालमत्तांची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी हिरेहट्टीहोळी (ता. खानापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते विवेक तडकोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यानुसार आज खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांच्या बेळगाव गणेशपूर येथील निवासस्थानी लोकायुक्तांनी धाड टाकली आहे
खानापूर तसेच हल्याळ तालुक्यात
गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचा दावा केला आहे.
जांबोटी सर्कल मधील हुळंद गावातील जमिनीच्या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे शासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी आणि सेवेत रुजू झाल्यानंतर प्रकाश
गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमिनी व मालमत्तांची संपूर्ण चौकशी करण्याकरिता आज बेळगावातील त्यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे .