मण्णूर, ता. बेळगाव येथील एका सेंट्रिंग कामगारानेगळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. उमेश रुक्माण्णा पाटील (वय ४१) रा. मण्णूर असे त्याचे नाव आहे. तो सेंटिंग काम करीत होता. अलीकडे त्याला दारूचे व्यसन जडले होते. तो कामावरही व्यवस्थित जात नव्हता. शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उमेशने आपल्या घराच्या पाठीमागील स्लॅबच्या ग्रीलला साडीने गळफास घेऊन जीवन संपविले आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत