युवा व्यवसायिक, नामवंत फुटबॉलपटू व राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक राहुल देशपांडे यांनी आपला वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा करताना हालाप्पा उचगावकर या रुग्णाला 25 वेळा डायलेसीससाठी 5 हजार रुपयांची मदत केली.
जनता कॉलनी, सुळगा -हिंडलगा येथील हालप्पा निंगाप्पा उचगावकर या 29 वर्षीय युवकाचे मूत्रपिंड निकामी झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर बीम्स इस्पितळात डायलिसिस उपचार सुरू आहेत. डायलिसिस विनियम विनामूल्य असले तरी हालाप्पा याला ये-जा करण्यासाठी वाहनांची सुविधा नाही. उपचाराबरोबरच हालाप्पाला रिक्षा किंवा अन्य वाहनांच्या सहाय्याने ये -जा करता यावी यासाठी युवा व्यवसायिक राहुल देशपांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याला 5 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या पुढाकाराने काल गुरुवारी ही मदत करण्यात आली.
राहुल देशपांडे यांनी कोरोना प्रादुर्भाव काळातदेखील रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भोजन वितरित केले होते. या शिवाय एका मुलाचा शैक्षणिक खर्च ही त्यांनी उचलला आहे. रस्त्यावरील बेवारस कुत्र्यांना ती नेहमी खायला घालत असतात. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक वेळा रक्तदान देखील केले आहे.