१९/०२/२०२२ रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ०६ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रतिवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते त्या अंतर्गत आज अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ०६ मध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
युवा समिती पदाधिकारी प्रतिक पाटील यांनी युवा समिती च्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नवीन विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यासाठी शाळेतील शिक्षक वर्गाचे प्रातिनिधिक आभार मानण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. जयश्री पाटील यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच यापुढेही ह्या उपक्रमास आपणही शिक्षकांच्या वतीने मदत करू असे आश्वासन दिले. शिक्षक श्री. रामलिंग बाबर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सदर कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक जयश्री पाटील, शिक्षिका नंदा बसूर्तेकर, एस. जी. पाटील, सविता निंगन्नवर, भुवनेश्वरी मंतूर्गिमठ, रामलिंग बाबर तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने श्री. अविनाश हलगेकर, प्रतिक पाटील, ओमकार पाटील, आनंद पाटील हे उपस्थित होते.