बेळगाव येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मध्ये गुरुवार दिनांक 3 एप्रिल रोजी जोतिबा देवाचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे यावेळी जोतिबाची विधिवत पूजा करण्यात येणार आहे.तसेच केदार ग्रंथाचे पठण करण्यात येणार असून बारा वाजता आरती करून तीर्थप्रसाद वाटप होणार आहे.त्यानंतर जोतिबा देवाचा जप करण्यात येणार आहे यावेळी भाविकांनी मंदिरात उपस्थित रहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
तसेच दुपारी 4 वाजता
जोतिबाची मूर्ती आणि बैलगाड्या कोल्हापूर वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर कडे चैत्र पौर्णिमा जोतिबाच्या दवण्याकरिता रवाना होणार आहेत. यावेळी देवाची विधिवत पूजा करून पालखी मंदिरातून बाहेर काढण्यात येणार आहे त्यानंतर वाजत गाजत शहराच्या विविध मार्गावरून मिरवणूक निघेल यावेळी जवळपास दीडशेहून भाविक पायी चालत तसेच 15 बैलगाड्या आणि जोतिबाची पालखी कोल्हापूरकडे प्रस्थान करणार आहेत.दिनांक 11 एप्रिलला जोतिबाचा दवणा करून परत माघारी बेळगावला 17 एप्रिलला येणार आहे.या 15 दिवसांच्या कालावधीत
वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम हेबाळ संकेश्वर निपाणी कागल कोल्हापूर येथे वस्ती करून 8एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथे पालखी आणि भक्त बैलगाड्या पोचणार आहेत.त्यानंतर दवणा पोर्णिमा 11 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता तर 12 एप्रिल रोजी पालखी सोहळा करून दिनांक 17 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबील घुगऱ्यांची जत्रा करून पालखी नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात पोहोचणार आहे असे दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9901058111 नंबर वर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे .
3 एप्रिलला नार्वेकर गल्लीतून जोतिबा डोंगाकडे भाविक होणार रवाना
