रामनवमीदिवशी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरुन काही तरुणांनी एका तरुणावर हल्ला केला. यामध्ये सदर तरुण जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रामनवमीदिवशी निघालेल्या चित्ररथ मिरवणुकीदिवशी जखमी तरुणाने काही तरुणांना सोबत घेऊन दुसऱ्या गटातील तरुणांना मारहाण केली होती. याचाच राग मनात धरत या तरुणांनी बुधवारी या तरुणाला तो काम करत असलेल्या कोनवाळ गल्ली परिसरातील स्पेअर पार्टस्च्या दुकानात जाऊन गाठले. त्याला जाब विचारत दुचाकीवरुन अनगोळला नेऊन मारहाण केली