वडिलांच्या निधनामुळे मानसिक अस्वस्थ बनलेल्या तरुणाने गळफासाने आत्महत्या केली. सोहन उमेश चव्हाण (वय १९, रा. बाळकृष्णनगर, यरमाळ रोड वडगाव) असे मृताचे नाव आहे.
सोहनच्या वडिलांचे गेल्यावर्षी निधन झाले
आहे. तेव्हापासून तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. घरात कुणाशी फारसे बोलत नव्हता. एकटेच राहायचे, असे तो करत होता. वडिलांच्या निधनाचा त्याला जबर धक्का बसला होता. यातूनच त्याने सोमवारी राहत्या घराच्या टेरेसवर जाऊन येथील लोखंडी सळईला साडीने गळफास घेतला.