बेळगाव
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न तज्ञ समितीची नियुक्ती करण्यात आली असून तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खा. धैर्यशील माने यांची फेरनिवड करण्यात आली आहे तर सह अध्यक्षपदी राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक आणि सदस्य पदी दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे. यासह सदस्यपदी माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, अध्यक्ष मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, वकील महेश बिर्जे, वकील रवी पाटील,प्रधान सचिव व वरिष्ठ विधी सल्लागार, विधी व न्याय विभाग विशेष निमंत्रितसचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव (सीमा प्रश्न) सदस्य सचिव अशा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.