कोल्हापूर येथे खासदार सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धैर्यशील माने खासदार यांचे अभिनंदन व सत्कार रमाकांत दादा कोंडुसकर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते यांच्या हस्ते करण्यात आला. ह्या भेटीदरम्यान येणाऱ्या काळात लवकरात लवकर तज्ञ समितीची बैठक लावून व या अधिवेशनाच्या काळात सीमा प्रश्न विषयी नक्कीच विषय मांडू. वैद्यकीय शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात सुद्धा आपण सीमा भागातल्या अजून चांगल्या रीतीने सेवा पोचू. व सीमा भागातल्या जनतेच्या तळागाळात पोचून होणारा अन्याय थांबू. दोन दिवसापूर्वी राज्यसभा सदस्यांनी सीमा प्रश्न हा संपलेला विषय आहे असं वक्तव्य केले त्यामुळे समस्त सीमा भागातल्या जनतेचा अपमान केला .त्याबद्दल चर्चा करण्यात आली व याविषयी आपण संसदेत नक्की आवाज उठवू असा आश्वासन दिले.
सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड झाल्याबद्दल खा धैर्यशील माने खासदार यांचा सत्कार
By Akshata Naik
