पुणे-बंगळूरराष्ट्रीय महामार्गावरील दोन ट्रकमध्ये झालेला अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दुचाकीस्वारांना चेसीने धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले तर सहाजण जखमी झाले. रविवारी (दि. ८) सायंकाळी हिरेबागेवाडीनजीक बडेकोळमठाजवळ ही घटना घडली. एकूण तीन वाहनांचा अपघात झाला असून दोन दुचाकी चिरडल्या गेल्या आहेत.
रफिक बशीरअहमद जांबोटी (रा. नंदगड ता. खानापूर) व शिवाप्पा चंद्रप्पा शहापूर (रा. हुबळी) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमी झालेल्या सहाजणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच
हिरेबागेवाडी ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल होते. या अपघातामुळे या रस्त्यावर रहदारीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी पंचनामा करुन रहदारी सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवून घेण्याचे काम सुरु होते.