येळ्ळूर दि. 27- येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी येळ्ळूर-अवचारहट्टी रोड येथे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन केले. यावेळी नवीन रोपांना खत घालून मशागत करण्यात आले. ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश समाजात जावा व पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य दत्ता उघाडे यांनी पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. वामनराव रवळू पाटील माजी APMC सदस्य, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, राजू पावले माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी विचार मानले. शिवाजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य,प्रकाश पाटील माझी ग्रामपंचायत सदस्य सतिश देसुरकर, माझी ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, दयानंद उघाडे ग्रामपंचायत सदस्य, राकेश परिट ग्रामपंचायत सदस्य, शिवाजी सायंनेकर, बंडू मजुकर, भिमराव पुण्याणावर, प्रकाश मालूचे, श्रीकांत नांदुरकर, कृष्णा शहापुरकर, कृष्णा बिजगरकर, परशराम कणबरकर, पपू कुंडेकर, बाळकृष्ण काकतकर,भरमान्ना कंग्राळकर, प्रवीण वालेकर, सुनिल कांबळे
इत्यादींनी उपक्रमात भाग घेतला.
श्री. राजु पावले यांनी आभार मानले.
‘महाराष्ट्र एकीकरण समिती’च्या वतीनेवृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम संपन्न
