सध्या हिजाब संघर्ष एक व्यवस्थित षड्यंत्राच्या आधारावर चालू आहे. ती आहे ‘जीन शार्प थियरी’! जीन शार्प हा अमेरिकेतील समाज शास्त्राचा एक प्राध्यापक. या थियरीत प्रामुख्याने ४ सूत्रे आहेत. धरणे धरायचे, आंतरराष्ट्रीय बातमी बनवायची, माध्यमातून तेथील विधान सभेत चर्चा होईल, हे पहायचे आणि शेवटी प्रकरण कोर्टात घेऊन जायचे असे टप्पे या थियरीचे आहेत. प्रस्तुत हिजाब संघर्ष याच दिशेने जात आहे, असे सांगून उद्योगपती आणि चलनचित्र वितरक श्री. प्रशांत संबर्गी यांनी हिजाब संघर्षामागील षड्यंत्र उघड केले आहे. ते हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हिजाब – भारताचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र’ या चर्चा सत्रात बोलताना म्हणाले.
या वेळी उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सौ. शुभावती बी. नायक या बोलताना म्हणाल्या की, संविधानाच्या कलम २५ मध्ये सार्वजनिक सुव्यवस्थेला, आरोग्य तसेच नैतिकतेला आणि त्यातील उपबंधांना न दुखावता आपले मूलभूत हक्क चालवावे, असे सांगण्यात आले आहे. हे विद्यार्थी उच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशाचे पालन न करता मनाप्रमाणे वागत आहेत. १४४ कलम लावले असताना देखील स्ट्राईक, गोंधळ करत आहेत, हे कायद्याचे उल्लंघन नव्हे का ? ते मूलभूत कर्तव्यांचे पालन न करता त्यांना लाभदायक असलेल्या हक्कांविषयी बोलत आहेत.
विश्व सनातन परिषदेचे अध्यक्ष श्री. एन्. भास्करन् म्हणाले की, आज हिजाबची मागणी करणारे उद्या आमच्या कुरानात ५ वेळा नमाज पठण सांगितले असल्याचे म्हणतील. त्यासाठी त्यांना स्वतंत्र नमाज स्थळ करून देणे शक्य आहे का ? त्यानंतर आम्ही हराम पदार्थ खाणार नाही, आम्हाला कॉलेज कँटीन मध्ये हलाल प्रमाणिकृत आहार पदार्थ उपलब्ध करून द्यावेत, असे म्हणतील. त्यानंतर आम्हाला रविवार नव्हे तर शुक्रवारी सुट्टी हवी असे म्हणतील. अशा रीतीने ते आपल्या भारताला इस्लामीकरणाकडे घेऊन जाऊ इच्छित आहेत.
हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा म्हणाले की, ही सर्व परिस्थिती पहाता भारताचे इस्लामीकरण करण्याचे षड् यंत्र उघड होत आहे. त्यासाठी पुढील उपाय म्हणजे हिंदूंनी जागृत होऊन संघटीत होणे. त्यासाठी या सर्व समस्यांवर एकच उत्तर म्हणजे ‘हिंदू राष्ट्र’ ! त्यासाठी सर्व संघटनांनी आणि हिंदुत्वनिष्ठांनी मनाने एक होऊन राष्ट्र रक्षणासाठी वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.