शिमोगा येथील बजरंग दल कार्यकर्त्याची काल हत्या करण्यात आली. हा प्रकार चुकीचा आणि निंदनीय असून प्रकारात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना कडक शिक्षा मिळावी .त्याचबरोबर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांचा निधी सरकारने मंजूर करावा. तसेच हिंदू कार्यकर्त्यांना व हिंदू प्रमुखांना सुरक्षा पुरविण्यात यावी आणि एसडीपीआय ,पीएफ आयसी, सीएफआय या संघटनांवर बंदी घालून त्यांच्या प्रमुखांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेना बेळगाव यांच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
कर्नाटक मध्ये आज हिंदुत्वाचा विचार करणारे बीजेपी सरकार आहे आणि या बीजेपी सरकारच्या कालावधीमध्ये हिंदू संघटनांचे कार्यकर्त्याची हत्या होत हे .त्याच्या मागील जे मुस्लिम संघटना आहे त्या संघटनांचे सदर हत्या करण्याचे काम चालू आहे .
या आधी देखील हिंदू कार्यकर्त्या ,प्रमुखांची हत्या झालेली आहे .तरी मात्र म्हणाव्या तितक्या लवकर आरोपीना अटक करण्यात आली नाही .त्यामुळे या संघटना त्याच्या प्रमुख यांना अटक करण्यात यावी आणि त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी .तसेच एसडीपीआय ,पीएफ आयसी, सीएफआय या संघटनांवर बंदी आणावी अशी मागणी श्री रामसेनेच्या वतीने करण्यात आली आहे .