आज राष्ट्रीय पोस्ट दिनानिमित्त दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगांव येथील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या मार्गदर्शनानुसार कॅम्प बेळगांव येथील मुख्य टपाल कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली.
या भेटीच्या वेळी पोस्टमास्टर लक्ष्मण चावडीमनी सर तसेच श्रीनिवास सर,दोडमणी सर या टपाल खात्याच्या टीमने विद्यार्थ्यांना टपाल कार्यालयातील विविध कार्यपद्धतींबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये पत्रे, पार्सल, स्पीड पोस्ट, टपाल तिकिटांचा वापर, व्हिसा संबंधित सेवा तसेच सुरक्षित आणि विश्वासार्ह अशा विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
या शैक्षणिक भेटीतून विद्यार्थ्यांना टपाल विभागाच्या कार्यपद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले आणि सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थी शिक्षकांची मुख्य टपाल कार्यालयाला भेट
