19 वर्षीय तरुणी, 29 वर्षीय तरुण एकमेकांवर प्रेम करून घरातून पळून गेले. त्यामुळे दुखी झालेल्या मुलीच्या वडिलांनी चक्क मुलगी आमच्या वाट्याला मेली असल्याचे समजून श्राद्ध घालत गावाला जेवण घातल्याची अजब घटना बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात घडली आहे.
सुश्मिता पाटील या तरुणीचे त्याच गावातील विठ्ठल बस्तवाडे या मुलावर प्रेम असल्याने, दोघे पळून गेले. विठ्ठल तहसीलदार कार्यालयात ग्रामसेवक म्हणून काम करतो. सुष्मिताच्या वडिलांना चार मुली असून सर्वात लहान मुलगी सुष्मिता आहे. मुलगी पळून गेल्याने घराण्याच्या संस्काराला धक्का असल्याने वडील दुखी होऊन श्राद्ध घातले.
सुरुवातीला रायबाग पोलिस ठाण्यात मिसिंग कंप्लेंट दिली. त्यानंतर नातेवाईकांना पाहुण्यांना बोलावून मुलीचे फोटो पूजन करून रुचकर जेवण घातले.
मुलगी जिवंत असताना वडिलांने आपल्या मुलीचा श्राद्ध आश्चर्य व्यक्त केले जात आहे.