बेळगाव : पोटदुखीला कंटाळून हुदली
ता. बेळगाव येथील एका वृद्धाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. मारिहाळ पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
सुरेश कल्लाप्पा कदम (वय ७५) रा. हुदली असे या वृद्धाचे नाव आहे. शुक्रवार दि. १० रोजी सकाळी १०.३० ते ११ या वेळेत हुदली येथील आपल्या शेतात विष पिऊन आपले जीवन संपविले आहे. पोटदुखीला कंटाळून या वृद्धाने विष पिऊन आपले जीवन संपविल्याचे समजते.
घटनेची माहिती समजताच साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एस. रुद्रापूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला