परिवहन महामंडळाच्या बसेस वरती कन्नड फलका बरोबरच मराठी फलकही लावण्यात यावेत अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे परिवहन खात्याकडे करण्यात आली आहे.
अल्पसंख्यांक कायद्याच्या अंमलबजावणी करावी आणि प्रत्येक बसेस वर कन्नड फलका बरोबरच मराठी फलकही लावण्यात यावे या मागणीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे.
तसेच या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठक ही बोलावण्यात आल्या मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहायला मिळात आहे. यासंदर्भात राज्य सरकारचे परिपत्रक दाखविण्यात येत आहे मात्र बेळगाव हे सीमेवर असल्याने बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे. आणि या सीमेवरती अल्पसंख्यांक भाषिकांसाठी काही सुरक्षा आणि अधिकार आहेत. त्यानुसार कायद्याने भाषिक अल्पसंख्यांक असलेल्या नागरिकांनी केलेल्या मागणीची पूर्तता व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगाव मध्ये 21 टक्के मराठी भाषिक आहे. पंधरा टक्क्यांच्या वर जर एका जिल्ह्यात नागरिक असतील तर त्या ठिकाणी राज्यभाषा बरोबरच आता भाषेचाही अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व बसेस सार्वजनिक ठिकाणी कन्नड फलका बरोबरच मराठी फलक लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
मात्र याबाबत अनेक अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करू आणि तोडगा काढून अशी उत्तर देत आहेत त्यामुळे मराठी भाषिक आणि पासून त्यांचा अधिकार काढून घेतला जात आहे. मया अल्पसंख्यांक भाषिकांच्या अधिकाराची अंमलबजावणी होत नसेल तर रस्त्यावर उतरून आंदोलने आणि मोर्चे काढू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे