मावळ्यांच्या वेशात पन्हाळा गड ते विशाळगड मार्गे पावनखिंड ही मोहीम मावळ्यांच्या वेशात कोल्हापूर बेळगाव परिसरातील अनेक शिवभक्तांनी उत्साहात पार पडली .दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक संस्था तसेच संघटनांच्या माध्यमातून पन्हाळा ते पावनखिंड मोहीम राबविण्यात येते. महाराष्ट्रासह देशभरातील शिवभक्त या मोहिमेत सहभागी होत असतात. मात्र, कोल्हापुरातल्या ‘रणमर्द शिलेदार’च्या सदस्यांनी यावर्षी शिवकालीन मावळ्यांच्या वेशामध्ये पन्हाळा ते पावनखिंड मोहीम राबविली आहे. अनेक गडकिल्ल्यांच्या मोहिमा सुद्धा त्यांनी अशाच वेशात केल्या आहेत.मोहिमा’रणमर्द शिलेदार’च्या माध्यमातून कोल्हापूरसह सातारा, पुणे, मुंबई, बेळगाव आदी ठिकाणचे मावळे गेल्या काही दिवसांपासून एकत्र आले आहेत.
गडसंवर्धन, युद्धकला, इतिहास संशोधन आणि इतर मोहीम यामाध्यमातून आयोजित केल्या जातात. सद्या अनेक सदस्य यामध्ये जोडले गेले आहेत. आजपर्यंत त्यांनी 20 ते 22 गडांच्या मोहिमा अशाच पद्धतीने शिवकालीन मावळ्यांच्या वेशात राबविल्या आहेत. आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांच्या मोहिमा असल्याने ते अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत . छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटून विशाळगडकडे पोहोचले होते. मात्र, याचदरम्यान पावनखिंड येथे रणसंग्राम घडला होता. यामध्ये अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचे रक्त सांडून बलिदान दिले होते. यामध्ये विशेष म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवराय विशाळगडावर पोहोचत नाहीत, तोपर्यंत शत्रूला खिंडीत रोखून ठेवले होते. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूच्या सैन्याला त्यांनी रोखून ठेवले होते. याच रणसंग्रामाला उजाळा मिळण्यासाठी दरवर्षी अनेक संस्था तसेच संघटनांच्या माध्यमातून पन्हाळा ते पावनखिंड मोहीम राबविण्यात येते.
या मोहिमेत उपस्थित मावळे कोल्हापूर चे आप्पासो रेवडे, सुजित जाधव,
अभिजीत भालबर,अभिषेक पाटील श्रेयस बावले,विवेक बुचडे,सूरज केसरकर,विक्रम पाटील,अक्षय पोवार,धीरज केर्लेकर पृथ्वीराज शिंदे,शिवराज जाधव,धनाजी पाटील,आकाश शिंदे,शुभम माळी,पृथ्वीराज पाटील,ओंकार पाटील,सागर पाटील आणि बेळगावचे रोहित यळळुरकर, प्रशांत कामती,ज्ञानेश्वर बिलगोजी,आशिष कोचेरी,किरण गुरव,ललित पोवार,ऋषी सणस,दत्ता,राम यादव सर या रणमर्द शिलेदरासहित मोहीम फत्ते केली .