मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेने आयोजित केलेल्या आनंदवाडी च्या आखाड्यात भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पैलवान नागराज बसीडोनी यांनी पै संतोष पडोलकर याला चितपट करत मैदान मारले.
आनंदवाडी आखाड्यात झालेल्या मैदानात कर्नाटक केसरी नागराज बसीडोनी व महाराष्ट्र चॅम्पियन संतोष पडोलकर पुणे ही प्रमुख कुस्ती माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळ्ळी डॉक्टर गणपतराव पाटील सतीश पाटील राम पवार मारुती घाडी आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.
यावेळी कुस्ती मैदानात झालेल्या या सामन्यात नागराज बसीडोनी ने संतोष पडोलकर याचा चौथ्या मिनिटाला एकेरी हाताचा कस चढवत चीत करून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. या वेळी जवळपास दहा हजाराहून अधिक कुस्ती शौकीनांच्या उपस्थित हा कुस्ती सोहळा रंगला.
यावेळी पहिल्याच मिनिटाला नागराजने संतोष वर दुहेरी पट काढून ताबा मिळविला पण संतोषने त्यातून सुटका करून घेतली तिसऱ्या मिनिटाला नागराजने एकेरी पट काढून संतोषला खाली घेत मानेवर ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला पण एकेरी हाताचा संतोषला अस्मान दाखवून कुस्ती मैदान मारले
तसेच दुसर्या क्रमांकाची कुस्ती अध्यक्ष संजय बेळगावकर मी इंडिया सुनील आपटेकर बाळाराम पाटील विलास घाडी यांच्या हस्ते लावण्यात आली .दुसरी कुस्ती एमजी सेंटरचा आकाश घाडी व आंतरराष्ट्रीय चॅम्पियन सौरभ पाटील राशिवडे यांच्यात झाली. यावेळी दुसऱ्या मिनिटाला आकाशने एकेरी पट काढत सौरभला खाली घेऊन चीत करण्याचा प्रयत्न केला पण त्यातून सौरभने सुटका करून घेतली सौरभने टाच मारून आकाशाखाली घेत मोळी बांधण्याचा प्रयत्न केला पण आकाशने चलाखीने सुटका करून घेतली सहाव्या मिनिटाला सौरभने एकेरी पट काढत आकाशाखाली घेऊन एक लांगी भरून हाताचा कस चढवून चीत करण्याचा प्रयत्न करत असताना पंचांनी नव्वद अंशाच्या वर हात घेतल्याने कुस्ती थांबविण्याची सूचना केली असता बेसावध आकाशला चित्त केल्याचे सांगून मैदान सोडले. त्यामुळे शेवटी पंचांनी ही कुस्ती बरोबरीत राहिल्याचे सांगितले
तसेच तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती ही पवन चिकनकोप कीर्तिकुमार यांच्यात रंगली. यावेळी रंगलेल्या कुस्तीत पहिलवान नी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले. या कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले मैदान यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या भव्य कुस्तीत सहभाग घेतलेल्या पैलवानांना उत्तेजन देण्यासाठी जीवन संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक आणि बेळगाव केसरीचे संस्थापक डॉक्टर गणपत पाटील यांनी विशेष बक्षीस दिले. तसेच या कुस्ती मैदानाला बेळगाव केसरी मीडिया पार्टनर म्हूणन लाभले .त्यामुळे मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने डॉ गणपत पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला .