आंबेवाडी येथे ज्ञानेश्वरी पारायण मंडळ याच्या वतीने पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला होता . यावेळी दिनांक 27 रोजी रात्री च्या महाप्रसादच्या पंगतीचे पूजन विनय कदम ,पृथ्वी सिंग ,आंबेवाडीतील बी जे पी कार्यकर्ते राहुल भातकांडे ,प्रमोद तरळे ,विकास भातकांडे सचिन शहापुरकर, युवराज मनोळकर ,दशरथ कोलते ,लक्ष्मण चोपडे मन्नूर येथील दिनेश बोगार उमेश चौगुले उमेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी विनय कदम व पृथ्वी सिंग यांनी व्यासपीठावर बोलताना आंबेवाडी गावातील जनतेच्या पाठीशी ठाम पणे उभे आहे व गावामध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित केल्यास आम्ही त्याला सहकार्य करू असे आश्वासन दिले तसेच येणाऱ्या महाशिवरात्रीच्या शुभेच्या दिल्या .याप्रसंगी सर्व पाहुण्यांचे पारायण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला .यावेळी राहुल भातकांडे यांनी सूत्रसंचालन केले.