सालाबादप्रमाणे पुणे स्थित शिवाजी ट्रेल या संघटने मार्फत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि मराठा सैन्याच्या भारत भर पाऊल खुणा असलेल्या गडांवर, स्वराज्यातील सरदार घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते एकाच दिवशीnजास्ती जास्त गडांवर पुजा केली जाते. त्याचाचं भाग म्हणून बेळगाव येळ्ळूर जवळील किल्ला, राजहंस गडाची सपत्नीक पूजा शिवाजी ट्रेलचे संयोजक आणि सद्भावना दूत श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे, हारोलीकर सरकार आणि दिलीपराव केशवराव रायजादे, हारोलीकर सरकार, यांच्या हस्ते रविवारी गडकिल्यांची पूजा करण्यात आली
या कार्यक्रमाच्या मार्फत भावी पिढीला गड किल्ल्यांचे महत्व पटवून देणे आणि किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन व्हावे या उद्देशाने किल्ल्यांचे पूजन केले जाते.कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने या किल्ल्यांचे संवर्धन करावे जेणे करून हे किल्ले भावी पिढीला पहायला मिळतील. हे किल्ले म्हणजे जुन्या काळातील शुरवीरांनी आपलं रक्त सांडून केलेल्या पराक्रमाचे हे किर्तीस्तंभ आहेत त्याचे जतन होणे ही काळाची गरज आहे.
पुजेचे पौरोहित्य श्री. बसवराज मठपती यांनी केले. या कार्यक्रमाला श्रीमंत सौ. सुचिता रमेशराव रायजादे, श्रीमंत सौ. नलिनी दिलीपराव रायजादे, श्रीमान सतीशराव कृ. चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड, सौ. स्मिता सतीशराव चीरमोरे, किल्लेदार गडकरी, पारगड, सर्व कु. चि. कुलदीपराव रायजादे, चि. शंतनुराव रायजादे, चि. शिवराज चीरमोरे, चि. ऋषभराव रायजादे तसेच सर्व श्री. यशवंत पेडणेकर, राजू बडमंजी, सुभाष पाटील, सुधीर नेसरीकर, शिवाजी बेकवाडकर, आदी शिवप्रेमी उपस्थित होते.