नागरिकाचे हाल ,सरकारचे दुर्लक्ष , टाळे ठोकण्याचा नागरिकांचा इशारा
सरकारी कार्यालयात ऑफलाईन कामे होत नसल्याने ऑनलाईन कामांना प्राधान्य देण्यात आले आहे . मात्र सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सर्व्हर डाऊन ची समस्या कायम असल्याने नागरिकांना तासनतास ताटकळत थांबावे लागत आहे .
नागरिकांना कॉम्पुटर उतारा मिळविण्याकरिता ग्रामपंचायतीच्या चकरा माराव्या लागत आहेत. सर्व्हर डाउन असल्याने रोजगार हमीची कामे ,नरेगा अंतर्गत होणारी कामे तसेच अनेक कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे नागरिकांना दररोज ग्रामपंचायतीला चकरा माराव्या लागत आहेत. ही समस्या बेळगाव जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये असून आपले काम वेळेवर पूर्ण होत नसल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त व्यक्त करत आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये सर्व्हर डाऊन ची समस्या कायम असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच सरकार देखील ही समस्या मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.ही समस्या त्वरित मार्गी लावण्याकरिता जिल्हा पंचायत सीईओ, गटविकास अधिकारी यांनी त्वरित बैठक बोलावून सर्व्हर डाऊन ची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी अशी मागणी होत आहे. जर असे न झाल्यास जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना नागरिकांकडून टाळे ठोकण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.