सालाबादप्रमाणे या वर्षीही बेळगाव शहापूर येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत महाशिवरात्र सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्री आणि पहाटे अभिषेक, पूजा, आरती आदी कार्यक्रम भक्तिभावात पार पडले. त्यानंतर दिवसभर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
महाशिवरात्रीनिमित्त मुक्तिधाम येथे भारत नगर येथील श्री भक्ती महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.शहापूर, वडगाव, हिंदवाडी,आनंदवाडी,खासबाग परिसरातील मोठ्या संख्येने शिवभक्तांनी आज श्री महादेव मंदिरात दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली.
मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने गेली 24 वर्षे स्वयंस्फूर्तीने स्मशान सुधारणेचे कार्य हाती घेण्यात आल्याबद्दल शिवभक्तांनी कौतुक आणि समाधान व्यक्त केले. कोरोनाची छाया आणि जनतेच्या आरोग्याची काळजी घेत यावर्षी मुक्तिधाम चा महाशिवरात्र महाप्रसाद सोहळा रद्द करण्यात आला आहे.