कर्नाटक सरकारच्या नगरविकास खात्याने घरपट्टी वाढविण्याचा अधिकार बेळगावसह राज्यातील सर्व महापालिकांना दिला आहे .ज्यावर्षी शासकीय मुल्य वाढविले जाणार नाहीत .त्या वेळी तीन टक्के घरपट्टी वाढविण्याचा अधिकारही देण्यात आला आहे .त्यामुळे आता बेळगावातील घरपट्टी तीन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील घरपट्टीत वाढ होणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. मिळकतींची घरपट्टी दरवर्षी तीन ते पाच पट्टे इतकी वाढणार आहे .जानेवारी 2019 मध्ये कर्नाटक सरकारने याबाबत असा वटहुकूम काढला होता .पण कोरोना व अन्य कारणांमुळे 2021- 22 या आर्थिक वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही .आता नव्या वर्षात 2022 आणि 2023 या वर्षात घरपट्टी वाढविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
त्यामुळे दरवर्षी सरासरी तीन टक्के घरपट्टी वाढ होण्याची शक्यता आहे .पुढील आर्थिक वर्षात घरपट्टी वाढविण्याबाबत प्रस्ताव बेळगाव महापालिकेकडून तयार केला जाईल मुद्रांक व नोंदणी खात्याने शासकीय मूल्य वाढवले नाही .त्यामुळे महापालिकेकडून तीन टक्के घरपट्टी वाढवली जाऊ शकते.