बुधवार दिनांक 2 मार्च रोजी खानापूर येथील राजा शिवछत्रपती स्मारकात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक तालुका समितीचे अध्यक्ष देवापा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या बैठकीत गेले वर्षभर समितीशी अलिप्त राहून गेल्या आठवड्यात राष्ट्रीय पक्षात प्रवेश केलेले खानापूर चे माजी आमदार श्री. अरविंद चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाचा ठराव सर्वसंमतीने पारित करण्यात आला.
तसेच दिगंबर पाटील यांच्या गटाने काल एक मार्च रोजी बैठक घेऊन एकी संदर्भात त्रीसदसीय समिती नेमून एकीची प्रक्रिया पुढे नेण्याचा जो प्रस्ताव दूरध्वनीद्वारे आबासाहेब दळवी यांनी कळविला आहे व वर्तमान पत्रात बातम्या आल्या, त्यासंदर्भात आपण प्रतिसाद देण्यास काहीच हरकत नाही व तालुका समितीने दहा सदस्यांची एक समिती नेमण्याचे ठरवावे व त्या समिती समोर दिगंबर पाटील यांच्या त्रिसदस्यीय समितीने एकी संदर्भात जो विषय आहे तो मांडावा व जे काही तारखे संदर्भात अल्टिमेटम दिला आहे तो साफचुकीचा असून व ज्यांना खरोखर एकी हवी असेल तर त्यानी संवादाने वेळ काळ ठरवावा लागेल त्यासाठी तारखेचा अल्टीमेटम अमान्य करीत आहोत असे कार्याध्यक्ष मारुती परमेकार यांनी सांगितले.
गेले वर्षभर खानापूर तालुक्यात खानापूर युवा समितीची स्थापना करून युवकानी मराठी माणसामध्ये एक नवचैतन्य निर्माण करून विविध कार्यात सहभाग दर्शविला .मराठी संस्कृती मराठी भाषा किंवा नागरिकांच्या इतर समस्या संदर्भात आवाज उठवून त्यांनी जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे,आहे त्यात त्यांचे कौतुक करून या संदर्भात या एकीच्या प्रक्रियेत युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील व इतर सदस्यांना स्थान देण्यात यावे, असे मत उपाध्यक्ष गोपाळ पाटील यांनी मांडले.
तालुक्यात एकी ही मराठी माणसाच्या न्यायहक्क व अस्मितेसाठी आवश्यक असून यात सर्वांनी विश्वासाने यात भाग घ्यावा पण यापुढील काळात यापुढे विघ्ने यासाठीही काहीतरी रूपरेषा ठरवावी असे मत सचिव गोपाळराव देसाईने यांनी मांडले, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती ही सीमा भागातील शिखर समिती असून त्यांच्या अधिपत्याखाली एकी होत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे, असे मत रणजीत पाटील यांनी मांडले, जोपर्यंत समोरा समोर येऊन चर्चेला सुरुवात होत नाही तोपर्यंत व्यापक बैठक बोलायचा प्रश्नच येत नाही एकी व्यापक बैठकी चे प्रयोजनच काय?असा सवाल राजाराम देसाई त्यांनी मांडला.एकीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच तालुक्यात जागृती करूनच एक भव्य व्यापक बैठक बोलवावी व राष्ट्रीय पक्षात गेलेल्यांचा निषेध नोंदवावा असे मत पांडुरंग सावंत यांनी मांडले.
दिगंबर पाटील गटाने एकीसाठी जी त्रिसदसिय समिती नेमली ती जर चर्चेसाठी येत असेल तर त्यांचे स्वागतच व्हायला हवे व यापुढे समितीत राहून राष्ट्रीय पक्षाशी जे संधान बांधून राहतील त्यांनाही घरचा रस्ता दाखवावा असे मत सुरेश देसाई यांनी मांडले, तालुका समितीच्या दोन्ही गटामध्ये एकी होणे काळाची गरज असून आम्ही खानापूर युवा समितीच्या माध्यमातून आपण गेले वर्षभर कार्यरत असून आता कुठेतरी यश येताना दिसत आहे, पण हे यश क्षणभंगुर न होता संवादाने याला भक्कम स्वरूप यावे, असे मत युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी मांडले, या बैठकीला सूर्याजी पाटील ,संभाजीराव देसाई,सदानंद पाटील,राजू पाटील, प्रतिक देसाई, विनायक सावंत, पुंडलिक पाटील (करंबळ) रामचंद्र गावकर, अजित पाटील, रवी पाटील, पुंडलिक पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते