बेळगाव चे प्रसिद्ध चित्रकार कला महर्षी कै. के बी कुलकर्णी यांचा स्मृतीदिन कार्यक्रम यावर्षी भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवारी 9 मार्च 2022 रोजी या बेळगावच्या कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अशा थोर सुपुत्राचा स्मृतिदिन करण्यात येणार आहे
बेळगाव टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या आर्ट गॅलरीच्या सभागृहात हा कार्यक्रम बुधवारी सकाळी दहा वाजता होणार आहे या स्मृतिदिनानिमित्त पेंटिंग स्पर्धा, प्रदर्शन प्रात्यक्षिके, गौरव पुरस्कार प्रदान आणि व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर असणार आहेत. मागील वर्षी म्हणजे 2021 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम साधेपणाने झाला होता मात्र या वर्षी आता हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे