बेळगाव केसरी च्या वतीने गोगटे रंगमंदिर येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम उद्या दिनांक 5 मार्च रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत पार पडणार असून या कार्यक्रमात युक्रेन युद्धामध्ये भारतातील काही नागरिक मृत्युमुखी झालेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे .
तसेच गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून सायंकाळी कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे .सदर कॅन्डल मार्च गोगटे रंग मंदिर ते धर्मवीर संभाजी चौक पर्यंत काढण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी ,प्रा डी एन मिसाळे आणि कॅप्टन गिरीश कुमार उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन बेळगाव केसरीचे संस्थापक संपादक डॉ गणपत पाटील यांनी केले आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.