जल जीवन मिशन (जेजेएम) या मोहिमेअंतर्गत कामांचा शुभारंभ आंबेवाडी (ता. जि. बेळगाव) येथे गुरुवारी सकाळी उत्साहात करण्यात आला. जल जीवन मिशन अंतर्गत पाण्यासाठी आंबेवाडी गावाला 65 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीतून पाण्यासंदर्भात केल्या जाणाऱ्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून करण्यात आला. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य पुंडलिक भांदुर्गे, नारायण लोहार, संगीत आंबेकर आदी उपस्थित होते.