सरकारी पूर्ण प्राथमिक शाळा सावगाव येथे भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने विधान परिषद सदस्य श्री साबाण्णा तळवार यांच्या अनुदानातून 4×10 फुटाचे चे 07 ग्रीन बोर्ड वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामीण मंडळ माध्यम प्रमुख सुरेश घोरपडे यांच्या हस्ते सरस्वती फोटो पूजन करण्यात आले. तसेच ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळ च्या वतीने ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 60 गावांना 400 ग्रीन बोर्ड देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
संकल्प पुर्तीच्या दिशेने सावगाव येथे बोर्ड देऊन आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आम्ही हाती घेतलेला उपक्रम यशस्वी करण्यासाठी विधान परिषद सदस्य साबाण्णा तळवार यांनी मोठा हातभार लावला आहे. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही हा उपक्रम संघटनेच्या जोरावर पूर्ण करू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे ग्रीन बोर्ड देऊन चांगले शिक्षण मिळावे हळूहळू का होईना शाळांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूया शिक्षित निर्व्यसनी पीढी निर्माण करण्याचा संकल्प समोर ठेवून आपण सर्वजण कार्य करूया असे विचार त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर यल्लाप्पा पाटील, भाजपा युवा नेते महेश पाटील, मारुती काकतकर, ग्राम पंचायत सदस्य गणपत पाटील, यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी S.D.M.C अध्यक्ष बळीराम पाटील, S.D.M.C उपाध्यक्ष अनिता पाटील, सदस्य गजानन घाटेगस्ती, पिराजी गुरव, भाउराव पाटील, सिद्राय पाटील, उमेश काकतकर, परशराम पाटील, राजु कांबळे, प्रेमा बाचीकर, राजश्री सुतार, सुजाता मेदार, मधुमती सुतार, शाळेचे मुख्याध्यापक एन. एस कोल्हापुरे, निवृत्त शिक्षक नागेश काकतकर, परशराम पिसाळे, कल्लाप्पा पाटील, संगीता बाणेकर, मल्लप्पा सावगावकर, यतेश हेब्बाळकर, किरण पाटील, नारायण कदम, रवी पाटील, युवराज पाटील, महेश कदम, परशराम बाणेकर, साईनाथ पाटील, परितोष हुक्केरीकर, लक्ष्मण गोजगेकर, वैजु सुतार तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एस. एम गौंडाडकर तसेच आभार प्रदर्शन एस. एन. गाणगी यांनी करुन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.