सुवर्णलक्ष्मी सोसायटीतर्फे महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. महानगरपालिकेत काम करणार्या राजश्री जाधव, उज्ज्वला हंगिरगेकर, तारा सालीकर या महिलांचा सत्कार करण्यात आला तर साक्षी मुतकेकर, गुणंजय शिरोडकर, प्राजक्ता देशपांडे, आदित्य बाळेकुंद्री, अनुज किल्लेकर, सुकृती कारेकर, प्रीती धुडूम, सई कारेकर, कीर्ती बांदिवडेकर आदींचा गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या म्हणून भातकांडे शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नुकर उपस्थित होत्या. त्यांनी वर्षभर महिलांचा सन्मान जपला जावा, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विठ्ठल शिरोडकर यांनी नाना शेठ यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. उपाध्यक्ष विजय सांबरेकर यांनी महिलादिन कसा सुरू झाला, याची माहिती सांगितली. संस्थापक मोहन कारेकर यांनी सर्वांना
शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जायंट्स ग्रुपच्या खजिनदार नम्रता महांगावकर यांचा सन्मान करण्यात आला. तृप्ती शहापूरकर यांनी आभार
मानले.