श्री मंगाई देवी स्पोर्ट्स क्लब वडगाव आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.श्री मंगाई देवी युवक मंडळाने फुलांचा वर्षाव करत सर्व महिलांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सामाजिक कार्यकर्ते अभिषेक कलघटगी, निकिता कलघटगी, माधुरी जाधव, नगरसेविका सारिका पाटील, नगरसेविका दिपाली टोपगी ,रिटा पाटील, संतोष टोपगी ,शशिकांत चव्हाण, विनायक पाटील, महेश धुडूम या सर्वांचे मंडळाच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर निकिता कलघटगी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
यावेळी कोरोना योद्धा आणि बेळगावच्या पहिल्या महिला अंबुलन्स ड्रायव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी जाधव पाटील यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व महिलांना संदेश दिला ,ज्या महिलांवर अन्याय होत आहे त्या महिलांना न्याय मिळवून देण्याकरिता सर्व महिलांनी पुढाकार घ्यावा. त्याच बरोबर महिलांनी पुढे येऊन रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवावा असे आव्हान केले.
यावेळी नगरसेविका सारिका पाटील यांनी भागातील काहीही समस्या असतील आपण सोडवून देऊ आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगितले. यानंतर अभिषेक कलघटगी यांच्या हस्ते स्टंप चे पूजन करून क्रिकेट खेळाचे उद्घाटन करण्यात आले.
गीता पाटील यांच्या हस्ते टॉस उडवण्यात आला. महिला दिवस असल्याकारणाने नगरसेविका सारिका पाटील यांच्या हस्ते चेंडू फळी खेळून खेळाची सुरुवात करण्यात आली.यावेळी मंगाई देवीच्या परिसरातील महिला आणि मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते