आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ३४ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रतिवर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते .त्याअंतर्गत आज अनगोळ येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ३४ मध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
युवा समिती पदाधिकारी प्रतिक पाटील यांनी युवा समिती च्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. युवा समितीतर्फे भावेश बिर्जे आणि इंद्रजित धामणकेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेतील पटसंख्या वाढीसाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
यावेळी मुख्याध्यापिका एम. एस. मडीवार यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षक श्री. पत्तार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शाळेतर्फे शिक्षिका शुभांगी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
सदर कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापिका एम. एस. मडीवार , शिक्षिका शुभांगी पाटील, शिक्षक पत्तार आणि इतर शिक्षकवर्ग तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने श्री. राजू पवार, महेश येळ्ळूरकर, इंद्रजित धामणेकर, राजू शिंदोळकर, भावेश बिर्जे, प्रशांत भांदुर्गे, प्रतिक पाटील, ओमकार पाटील, आनंद पाटील हे उपस्थित होते.