श्री चांगळेश्वरी विश्वस्त मंडळ व कार्यकारणीची बैठक गुरुवार दिनांक 10 मार्च रोजी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नारायण कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .यावेळी वाय सी इंगळे यांनी प्रास्ताविक केले .बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करून श्री चांगळेश्वरी श्रीदेवी श्री कलमेश्वर महालक्ष्मी वाढदिवस व महाराष्ट्र मैदान चा संयुक्त यात्रा उत्सव कार्यक्रम ठरविण्यात आला .
यावेळी सोमवार दिनांक 25 एप्रिल रोजी आंबील गाडे मंगळवार दिनांक 26 एप्रिल रोजी इंगळ्या कार्यक्रम बुधवार दिनांक 27 एप्रिल रोजी महालक्ष्मी चा वाढदिवस आणि गुरुवार दिनांक 28 एप्रिल रोजी महाराष्ट्र मैदान जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी तानाजी हलगेकर ,परशराम पाटील ,नागेंद्र पाखरे ,राजू पावले ,प्रदीप देसाई ,मधु पाटील ,दुद्धाप्पा बागेवाडी मनोहर अण्णू पाटील दौलत कुगजी ,परशुराम घाडी प्रकाश पाटील महादेव मंगनाईक परशराम कंग्राळकर हेमंत पाटील भरमाण्णा बाळेकुंद्री अनिकेत पाटील पृथ्वीराज पाटील संदीप पाटील श्रीधर कानशिडे व इतर नागरिक उपस्थित होते.