धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती परिसरातील सुशोभीकरणाचे काम सध्या चालू आहे .
बेळगावकरांचा मानबिंदू असणाऱ्या धर्मवीर संभाजी चौक परिसरातील स्मारकामुळे अधिकच आकर्षक होत आहे.
सदर सुशोभीकरणाचे हे काम शहराचे आमदार अनिल बेनके यांच्या फंडातून केले जात आहे होणाऱ्या कामाचे आमदार अनिल बेनके व धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरणाचे अध्यक्ष सुनील जाधव सरचिटणीस प्रसाद मोरे वेळोवेळी दखल घेत पाहणी करत आहेत.
सदर काम ऐतिहासिक पद्धतीचे व बेळगावकर इतिहास प्रेमीच्या मनात उतरावे असे करत आहेत धर्मवीर संभाजी महाराज व बेळगावकरांचा ऐतिहासिक संबंध आहे संभाजी महाराज यांचे बेळगावात वास्तव्य झालेले आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत बेळगावकर जनता फार संवेदनशील आहे त्यामुळे स्मारकाचे काम दर्जात्मक व्हावे, याची कठोर परीक्षण सुशोभीकरण समितीचे पदाधिकारी करत आहेत.
स्मारकासाठी घडीव दगडाचे काम चिरेबंदी काम करण्यात येत आहे. कुशल कारागिराकडून हे काम करून घेण्यात येत आहे . त्यामुळे या कामाचा दर्जा उच्च आहे सदर कामाची पाहणी करून शंभू भक्त समाधान व्यक्त करत आहेत
यावेळी धर्मवीर संभाजीराजे सुशोभीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मूर्तिकार संजय किल्लेकर यांना महाराजांच्या मागील भिंतीवरील स्वराज्याच्या इतिहासातील कोरीव काम सर्वानुमते देण्यात आले.
यावेळी मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी सुशोभीकरणाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे पण मध्यंतरी कोरोना कारणामुळे निधी उपलब्धतता अनिमित आल्यामुळे काम संथ गतीने चालू होते. आता सरकारी निधीची व्यवस्था झाल्यामुळे कामास गती आली आहे. त्यामुळे लवकरच सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास जाईल असे मत व्यक्त केल
यानंतर शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री बंडू केरवाडकर यांनी कंत्राटदार व सुशोभीकरण समिती यांचे योग्य दिशेने कार्य चालू आहे पण कोरीव दगडाचे काम चालू असल्याने त्याला पुरेसा वेळ देणं गरजेच आहे असे मत त्यांनी मांडले.
यावेळी बंडू केरवाडकर मूर्तिकार संजय किल्लेकर, मराठा समाजाचे नेते किरण जाधव गुणवंत पाटील, श्रीनाथ पवार नितीन जाधव प्रसाद मोरे सुनील जाधवसह शंभु भक्त या वेळी उपस्थित होते