महिला विद्यालय मंडळाच्या महिला विद्यालय मराठी हायस्कूल येथे दि.10रोजी सहशिक्षिका सौ.एम.डी. पत्की व इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ पार पडला .यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आशा नेसरकर,मंडळाचे अध्यक्ष भानुदास कपाडिया,उपाध्यक्ष मधुकर परांजपे, चेअरपर्सन डॉ शोभा शानभाग तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री व्हि. एन. पाटील, सत्कारमूर्ती मीरा पत्की व त्यांचे पती दत्तकुमार पत्की उपस्थित होते.
सुरुवातीला विद्यार्थिनींनी ईशस्तवन व शाला गीत सादर केले .मुख्याध्यापक श्री व्हि. एन.पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थिनींनी व शिक्षकांनी सौ.पत्की व दहावीच्या विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.व्यासपीठावरील मान्यवरांनी पत्की दांम्पत्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व प्रत्येक वर्गाकडून भेटवस्तू देण्यात आल्या.
प्रमुख पाहुण्या आशा नेसरकर यांनी विद्यार्थिनींना भावी आयुष्यातील मुलींची जबाबदारी, ध्येय गाठण्यासाठी आपले सुप्त गुण कसे ओळखले पाहिजेत.मानसिक, बौद्धिक व शारीरिक क्षमता कशी वाढवली पाहिजेत यावर बरीच उदाहरणे देऊन मुलींना उपकृत केले.तसेच श्री बालमुकुंद पत्की यांनी सुद्धा विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले.या प्रसंगी दहावीच्या विद्यार्थिनींनी शाळेला उपयुक्त अशा शैक्षणिक साहित्यासाठी मुख्याध्यापकांच्या कडे रोख रक्कम सुपूर्द केली.