हिंडलगा येथील महालक्ष्मी देवी यात्रेची पहिली जयंती तिथीनुसार दि. 5 रोजी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यात्रोत्सव कमिटीने आवाहन केल्यामुळे भाविकांनी कोरोनाच्या नियमांचा अंमल करुन सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशेव मार्गदर्शक रमाकांत पावशे उपस्थित होते.प्रथम खजिनदार उदय नाईक यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले.
व संघाच्या वतीने सर्वांचे स्वागत केले.
यावेळी पुजेचा मान निवृत मुख्याध्यापक व
संघाचे सचिव प्रकाश बेळगुंदकर पत्नी डॉ. सुनिता बेळगुंदकर व प्रतिनिधी महादेव बेळगुंदकर व पत्नी बेळगुंदकर उपस्थित होते.पौरोहित्य निळकंठ कुलकर्णी यांनी केले. देवीचे पुजारी भावकाणा सुतार उपस्थित होते.
देवीला अभिषेक घालून पूजन करण्यात आले. जयंती कार्यक्रमाला हिंडलगा भागातील नागरिक, महिलावर्ग व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत देवीची ओटी भरणी कार्यक्रम संपन्न झाला. आभार राजू कुपेकर यांनी मानले.
जयंती साजरी करण्यासाठी मोहन नाईक, मदन कोकितकर, बाळू सांगावकर, मुकुंद कंग्राळकर, मोहन म्हादू नाईक, प्रकाश कडोलकर, बंटी सरप, मोहन पावशे, विनायक पावशे, ग्रामपंचायत सदस्य
रामचंद्र कुद्रेमनीकर, प्रवीण पाटील,
चेतना अगसगेकर व संघाचे पदाधिकारी
व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला
भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.