No menu items!
Thursday, December 5, 2024

शिवाजी नगर मधील या महिलेला अखेर मिळाला आधार

Must read

गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर उन्ह पावसात एक वृद्ध महिला रस्त्यावर वास्तव्यास होती. याबद्दल माहिती मिळताच सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर आणि फेसबुक फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून त्या महिलेला सरकारी विश्रामगृहात हलविण्यात आले.

सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्या हेल्प फॉर निडी या प्रकल्पाअंतर्गत सदर महिलेला श्री नगर परिसरातील होम फॉर होम लेस या आश्रयस्‍थानी हलविण्यात आले आहे.

तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी या वृद्ध महिलेबद्दल पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांना याबाबत माहिती दिली .यावेळी त्यांनी
शिवाजीनगर हद्दीतील पोलिसांशी संपर्क साधून महिला पोलीस अधिकाऱी यांना घटनास्थळी पाठवले.

यावेळी शिवाजी नगर परिसरातील नागरिकांनी देखील सदर वृद्ध महिला कोणत्या अवस्थेत आपले जीवन रस्त्यावर कंठीत होती याबद्दल माहिती दिली. आणि महिलेला अशाप्रकारे मदत दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचे आणि पोलिसांचे आभार मानले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!