15 मे रोजी बेळगाव येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या एकत्रिकरणाचा कार्यक्रमासाठी व बेंगळोरस्थित मराठा समाजाच्या मठाचे मठाधीश म्हणून अधिग्रहण केल्याबद्दल मंजुनाथ स्वामींचा सत्कार करण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निमंत्रण देण्यात आले .
याप्रसंगी बोलताना किरण जाधव म्हणाले,मराठा समाजाचे महत्वाचे अधिष्ठान बेंगळोर येथे आहे. हे सर्व समाजाला समजणे गरजेचे आहे. शहाजीराजांनी स्थापन केलेला हा मठ सर्व मराठा समाजासाठी वंदनीय आहे.मराठा समाजाचे गुरु म्हणून मंजुनाथ स्वामींचा पट्टाभिषेक झाला ही महत्त्वपूर्ण घटना आहे,त्यासाठी मराठा स्वामीचा भव्यदिव्य सत्कार बेळगाव येथे करण्यात येणार आहे स्वामीजींनी आमंत्रण स्वीकारून आशीर्वाद दिले आहेत.
याप्रसंगी बोलताना स्वामीजींनी मठाचा इतिहास विशद केला त्याचबरोबर आजवरचे मठाधिश व त्यांच्या कारकर्दीचा धावता आढावा सांगितला. मराठा समाजाच्या इतिहासा विषयी त्यांनी माहिती दिली.
याप्रसंगी चंद्रकांत कोंडस्कर, दत्ता जाधव,रमेश रायजादे, सुनील जाधव, सागर पाटील, सुहास हुधार,,संजय कडोलकर, केदारी करडी,विशाल कंग्राळकर यासह अन्य उपस्थित होते