उत्तर प्रदेश कानपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत भाग घेण्याकरिता आज बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचा महिला जुडो संघ आज रवाना झाला आहे.
कानपूर येथील छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठात सदर स्पर्धा पार पडणार असून या स्पर्धेत बेळगाव येथील रम्या जिराली सरिता केसरेकर रोहिणी अक्षता संकट सहाना एस आर आदिती परब विद्यार्थ्यांनी भाग घेणार आहेत.
तसेच कॉलेजच्या प्राचार्या संघाच्या प्रशिक्षिका रोहिणी पाटील याही त्यांच्यासोबत रवाना झाल्या असून पूर्ण कॉलेजच्या वतीने या सर्व विद्यार्थिनींना पाठिंबा देण्यात येत आहे.याबरोबरच संचालक मंडळाचे विद्यार्थिनींना प्रोत्साहन लाभत आहे